वन परिक्षेत्र खामगांव अंर्तगत,अवैध वृक्ष कटाई करणार्या आरामशीन वर कारवाई करण्यात यावी ! एआय एम आय एम ची मागणी/foresht

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव – वन परिक्षेत्र कार्यालय खामगाव यांच्या अंतर्गत येणाऱ्या आरामशीन मध्ये विना परवाना माल तसेच अवैध वृक्षतोड यांची पूर्ण चौकशी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी एआय एम आय एम.
खामगांव शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांनी उप वनसंरक्षक अधिकारी बुलढाणा उप वनसंरक्षक कार्यालय बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद आहे की वन परिक्षेत्र कार्यालय खामगाव अंतर्गत येणाऱ्या शेगाव, खामगाव तालुक्या मध्ये विना परवानगी वृक्षतोड होत असून, हा माल सर्रास वाहतूक खामगाव व शेगाव तालुक्यामध्ये होत आहे . हा माल सर्व आरामशीनवर विना परमिशन (विना पासचा मालाची कटाई होत आहे.) हा सर्व प्रकार वन परिक्षेत्र अधिकारी श्री. किशोर पडोळ यांच्या आशीर्वादाने चालू आहे.

असा आरोप निवेदनात करण्यात आला.यावरून असे स्पष्ट होते. दि.०४/१०/२०२३ रोजी लोक जागरण या युट्यूब चैनल वर आरा मशीन वरील अवैध लाकूड साठा बाबतीत बातमी सुद्धा प्रसारित झाली आहे तरी सुद्धा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी आर्थिक हेतू साधून बंद केलेले आहे. या सर्व प्रकारावर डी.एफ.ओ. आणि आर.एफ.ओ साहेबानि जातीने लक्ष देवून दोन्ही तालुक्यातील आरामशीनवर स्वतः जावून सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अवैध पणे वृक्ष कटाई करणार्या आरामशीनवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने AIMIM तर्फे शेगाव आणि खामगाव दोन्ही तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन केले जाईल. असा ईशारा मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ,AIMIM खामगाव शहर अध्यक्ष यांनी दिला.वन परिक्षेत्र खामगांव अंर्तगत,अवैध वृक्ष कटाई करणार्या आरामशीन वर कारवाई करण्यात यावी ! एआय एम आय एम ची मागणी/foresht

Leave a Comment