वडशिंगी सरपंच पदी सौ शितल सुनिल वानखडे यांची वर्णी

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागुन असलेल्या व राजकीय दृष्टीने तेवढीच महत्त्वाची असलेली ग्रामपंचायत वडशिंगी येथील सरपंच पदाची निवडणूक आज संपन्न झाली.11 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये याआधी एस टी प्रवर्गासाठी आरक्षित होते परंतु या प्रवर्गातील एकही सदस्य नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा कलम 30 अंतर्गत सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यानुसार आज दि 19 मार्च रोजी घेण्यात आलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये जळगाव जा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर यांच्या पॅनलच्या सौ शितल सुनिल वानखडे ह्या 11 पैकी 6 मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवार कृष्णा प्रभाकर कावरे यांच्या विरुद्ध विजयी घोषित करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी मुंढे यांनी कामकाज बघितले तर सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक धोटे हे होते. निवडणूक शांततेत पार पडली असुन पोलिस प्रशासनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये बीट जमादार वानखडे, सहकारी व पो पाटील अनंता ठाकरे हे होते.सौ वानखडे यांच्या सरपंच पदी निवडी साठी शुभमं देवचे उपसरपंच, सौ प्रकाश भगत, सौ सुमन सत्यविजय सातव,बळीराम रहाटे, राहुल मानकर ग्रा प सदस्य यांच्या बरोबर येनकर सर,सहदेव खिरोडकार,भिकभाऊ उमरकर, भगवान देवचे,सत्यविजय सातव, भगवान दाते,गजानन पुंडे, रमेश भगत,गजानन कावरे, कैलास भगत,महादेव उमाळे,डीगंबर अंबुस्कर संतोष गावंडे, मुकुंद गावंडे, वसंत राऊत, किसन उमाळे, शालिग्राम राखोंडे, बळीराम दाते, संजय भगत, अनंत शेवाळे,किसान धबाडे हे उपस्थित होते

Leave a Comment