लॉटरी लागल्याचे आमिष दाखवुन एका महीलेची ३ लाख८oहजार रूपयांची ऑनलाईन फसवणुक पोलीसात गुन्हा दाखल

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

लॉटरीचे आमिष दाखवत किनगाव येथील महिलेची ३ लाख ८० हजारात फसवणूक; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खासगी नोकरी करणाऱ्या किनगाव येथील ३८ वर्षीय महिलेला अज्ञात मोबाईल धारकाने लॉटरीचे आमिष दाखवत तीन दिवसात ३ लाख ८० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील ३८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी सकाळी १० वाजता त्यांना त्यांच्या मोबाईलव अनोळखी व्यक्तीचा व्हॉटसॲपवर कॉल आला. त्याने सांगितले की आपल्याला २५ लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. तुमचा खाते क्रमांक आणि फोटो पाठवा. तुमच्या खात्यात रक्कम पाठवायची आहे. त्यावर महिलेने आपल्याला पैसे नको आहेत असे सांगितले व फोन कट केला. दरम्यान, पुन्हा त्यांना फोन आला महिलेशी गोड बोलून विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने त्यांच्या पतीचे बँकेचे डीटेल्स दिले. त्यानंतर बँक मॅनेजरला १ लाखसाठी १ हजार रूपये असे २५ लाखासाठी २५ हजार रूपये फोन-पेवर पाठवा. त्याने दिलेल्या मोबाईलनंबरच्या फोन-पे वर महिलेने सुरूवातीला २५ हजार रूपये पाठविले. त्यानंतर वारंवार काहीना काही कारण सांगून एकुण ३ लाख ८० हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले. पैसे पाठवून देखील परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात शनिवार २ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.

Leave a Comment