——————————————-
हिंगणघाट:- नईम मलक
स्थानिक रोटरी क्लब हिगंणघाट आणी सिंगर ईंडिया क.च्या संयुक्त विद्यामाने लोढा हाॅस्पिटलचे बाजुला माजी नगराध्यक्ष मा प्रेमबाबु बसंतानी यांचे हस्ते व डा. लोढा , ममता पाखराणी ,पी. एस.आय मुंढे साहेब, कार्यक्रम संयोजक सहप्रांतपाल मुरली लाहोटी , रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा जितेंद्र केदार , ड़ा अशोक मुखी यांचे उपस्थितीत दिप प्रज्वलित व फित कापुन उदघाटन करण्यात आले.
या प्रशिक्षणचा कालावधी तिन महिण्याचा असुन तसेच हा कोर्श नविन बॅचसह पुढेही चालु राहिल.
यात शिवनयंत्र चालविण्यापासुन तर ड्रेस डिझायनिंग पर्यतची कला शिकवण्यात येईल.
या प्रसंगी प्रेमबाबु बसंतानी यानी महिलांसाठी नगर परीषद मधे असनार्या अनेक योजनाची माहीती दिली तसेच अशा प्रशिक्षाणामुळे महिलांना रोजगार मिळने सोपे जाईल तसेच रेडीमेड कापडाची प्रचंड मागनी असल्यामुळे जॉब वर्कसाठी शिलाई कर्मचार्यांची मोठी गरज आहे त्यामुळे या प्रशिक्षणाला विशेष महत्व आहे. प्रशिक्षणातुन शिक्षण झालेल्या महिलांच्या कुटुंबाला आर्थीक मदतही मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार यांनी केले . प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढवा सादर केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा अशोक बोंगिरवार यांनी तर आभार प्रदर्शन सचिव पुंडलिकजी बकाने यांनी केले.
कार्यक्रमाला ड़ा .रमेश रांका, ड़ा .प्रकाश लाहोटी,ड़ा.अशोक मुखी ,पिताबंर चंदानी,शाकीरखा पठाण, सुरेश चौधरी ,प्रा माया मिहानी, सौ मंजुशा मुळे ,जितेंद्र वर्मा,मुकुंद मुधंडा , सतीश डांगरे ,पंकज देशपांडे,राजेंद्र गुलकरी यांची विशेष उपस्थिती होती.