अनिलसिंग चव्हाण
मुख्य संपादक
897 555 1991
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पतीदेव विजयी होताच बायकोने चक्क पतीदेवांला खांद्यावर घेवून मिरवणूक काढली.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायतीमधील ही दृश्य आहे.
पुण्यात या दृश्य पाहून लोकांचे डोळे पांगुण गेले ही महत्व ठरणारी गोष्ट ठरली आहे.
निवडणूक जिंकलेल्या नवऱ्याला चक्क खाद्यांवर उचलून बायकोनेच मिरवले आहे. ही दृश्य फोटो पाहून महिल्याना आनंद होताच असेल व सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचा जोरात व्हायरल होत आहे.
ही बातमी पण महत्वाची आहे क्लिक करून नक्की पहा
https://www.suryamarathinews.com/post/8103
या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले होते.
निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती.
मात्र, पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने असा पण जल्लोष केले की पतीला चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली.
पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच पतीला खांद्यावर उचलून घेतले होते.
गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागावर वर्चस्व मिळवले.
या घवघवीत यशामागे महिलांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायाचा हटके जल्लोष केला.
पती संतोष यांना खांद्यावर उचलून पत्नी रेणुकाने गावात आनंदाने मिरवणूक काढली. पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी २२१ मतं मिळवत विरोधी उमेदवाराला पराभूत केले.
या उत्साही पती-पत्नीचे फोटो गावात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.