रुग्णसेवेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज; ज्ञानेश्‍वरदादा पाटील यांचे आवाहन

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

समाजकारण आणि राजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असल्या तरी वेगवेगळ्या पक्षीय विचारधारेचे लोक सत्तेकरिता एकत्र येताना आजवर आपण बघितलेत. मात्र लोकहितासाठी एकत्र येऊन सेवा व परमार्थाची यात्रा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून घडत आहे. सारथी सामाजिक संस्था व माऊली सेवाभावी संस्थेतर्फे भविष्यात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात गोर- गरिब कष्टकरी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध दुर्धर आजारग्रस्त रुग्णांकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू, असे प्रतिपादन माऊली हार्ट केअर व माऊली डायलिसीस सेंटरचे सर्वेसर्वा ज्ञानेश्‍वरदादा उपाख्य नानासाहेब पाटील यांनी केले.
नानासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाआरोग्य शिबिर आज, 11 ऑक्टोबरला जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घेण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील होते. सारथी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ भिसे, साध्वी सर्वेश्‍वरी दिदी, पत्रकार डॉ. जयंतराव खेळकर, डॉ. राजपूत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाला सारथी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण मनसुटे, उपाध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय खेर्डेकर, सचिव अ‍ॅड. अभिमन्यू वाघ, सहसचिव प्रविण चिपडे, कोषाध्यक्ष सुयोग मनसुटे यांच्यासह आनंद भोरे, किसना बुंदे, जय कोगदे, अभिषेक हिस्सल, राहुल ढोले, स्वप्निल भोरे आदी सदस्यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. प्रास्ताविक गोविंद अंबुसकर यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रविण मनसुटे यांनी मानले.

Leave a Comment