राजू खान यांची वर्धा (काँझुमर) उपभोक्ता सोसायटी च्या डायरेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी सन्मान चिन्ह देऊन केला सत्कार……
हिंगणघाट :- मलक नईम
आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून ”जनसंपर्क अभियानाची” सुरुवात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या द्वारे हिंगणघाट शहरातून करण्यात आली. यावेळी हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक १९ शास्त्री वॉर्ड येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या समजुन घेतल्या. तसेच प्रभागातील प्रमुख सद्यस्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. तसेच येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नगरसेवक कसे निवडून येतील यावर जास्तीत जास्त भर देत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. फक्त निवडूण येण्यासाठी म्हणून नाही तर वॉर्डातील स्थानिक नागरिकांच्या समस्या जास्तीत जास्त कश्या सोडविता येईल यावर जास्तीत जास्त भर देण्याचे ‘अतुल वांदिले’ यांनी यावेळी बैठकी मध्ये सर्व कार्यकर्त्यांना सांगितलें.
या बैठकी मध्ये वर्धा उपभोक्ता सोसायटी च्या डिरेक्टर पदी श्री. राजू खान यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शाल-श्रीफळ व सन्माम चिन्ह देऊन सत्कार केला.
याप्रसंगी रा.कॉ. पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, नाझीर भाई, जावेद मिर्झा, सुनील भुते, नितेश नवरखेडे, अजय परबत, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, बच्चु कलोडे,जगदीश वंदिले,अनिल भुते, राजू मुडे आकाश बोरीकर,इरफान सय्यद,वालीद शेख,अकबर शेख,फैजान पठाण, फरहान कुरेशी, नादिम अली, अरबाज खान,अलिब बेग,नौशाफ शेख, अखिल खान, राजू खान, अखतर खान, मोहसीन खान, जगदीश किरपाल यांच्यासह वॉर्डातील सर्व नागरिक उपस्थित होते.