हिंगणघाट :- कलोडे चौक येथील ,मौजा पिंपळगांव सर्वे क्र. १७६/२ या शासकीय जागेतील दुकाने व झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्याबाबतचे पत्र उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा चांच्या कार्यालयाद्वारे सर्वं दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारकांना मिळाले आहे. परंतु हे दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारक गेल्या २०-२५ वर्षापासून त्या जागेवर राहत असून व्यवसाय व रोजमजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करित आहे. आता जर हे अतिक्रमण हटविण्यात आले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल व ते सर्व दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारक हे बेरोजगार होतील तसेच त्यांचा संसार उघड्यावर पडेल. त्यामुळे सदर अतिक्रमण हे रद्द करण्यात यावे, किंवा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा यांच्या पत्रानुसार त्या जागेवर बचत गटांना उत्पादित मालाची विक्री करण्याकरीता वर्धिनी विक्री केंद्राचे बांधकाम करण्यात येणार आहे. सदर जागेवर जर आपण सदर अतिक्रमणधारकांना वर्धिनी विक्री केंद्रामध्ये दुकानदारांना १०x१० चे गाळे काढून दिले व त्या गाळ्यांमध्ये यांना स्थाई केले तर अतिक्रमणधारक हे बेरोजगार होण्यापासून वाचतील व त्यांचा रोजगार हा कायम राहील तसेच त्यांचा संसार उघड्यावर येणार नाही व झोपडपट्टी अतिक्रमणधारकांना त्यांच्या राहण्याकरीता स्थाई पट्टे देण्यात यावे. तसेच आपण दुकान व झोपडपट्टी अतिक्रमणधारक यांच्याशी भेट घेवून व चर्चा करून यावर यथोचित मार्ग काढण्यात यावा.
अतिक्रमणधारकांचा व त्यांच्या परिवाराचा विचार करुन हे अतिक्रमण थांबविण्यात यावे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कलोडे चौकातील अतिक्रमण धारक यांनी मा. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन दिले.