रताळी येथील यादीतून वगळण्यात आलेल्या लोकांचा घरकुल योजनेत समावेश करावा ‘सरपंच सौ अलकाताई लव्हाळे यांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

रताळी येथील पंतप्रधान घरकुल यादी आराखडा मंजुर होऊन त्या घरांची प्रत्यक्षात एक ग्रामसेवक व आपरेपर यांच्या नेमणूक करण्यात आली होती व त्यावेळी प्रत्येक घरात बसून आँनलाईन टँगिंग करण्यात आले परंतु हि बाबा टेक्निकल म्हणजे जे फोटो घेतले ते अपलोड करुन त्याची पोच पावती नेमनुक केलेल्या ग्रामसेवक दिली .ते अपलोड झाले किंवा नाही ते आँपरेटर व ग्रामसेवक यांना च माहीत होते .आणि आता प्रत्यक्षात राताळी येथील २४० घंराची जी ओ टँगिंग करण्यात आलि आणि आता आँनलाईन यादी जाहीर झाली त्यामध्ये राताळी येथील फक्त१८० घरकुले आँनलाईन दिसत आहे .यादिमधील जवळपास ६०लोकांना या यादिमधुन वगळण्यात आले आहे. त्या.वगळण्यात आलेल्या अनेक लोकांनजवळ एक गुंठा सुध्दा जमिन नाही अत्यंत गरज असेलच लोक या यादित आँनलाईन दिसत नाही हि खरी चुक आँपरेटर ची आहे त्यामुळे अशा वगळण्यात आलेल्या लोकांना या या यादित सहभागी करून घ्यावे असे निवेदन आज राताळी सरपंच अलका लव्हाळे यांच्या वतीने भानुदास लव्हाळे यांनी आज सिंदखेडराजा बीडीओ घुनावत साहेब यांना दिले यावेळी चर्चा करतांना केवळ राताळी या गावाच्या यादिचाच प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरात निर्माण होणार आहे. जसजसे लोकांच्या पर्यंत हि आँनलाईन यादी जाईल त्यावेळी त्या गावाच्या सरपंच व सदस्य यांची चुक नसतानाही गावकऱ्यांचा रोष सरपंच व सदस्य यांच्यावर येणाऱ आहे त्यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालुन ही बाब गांभीर्याने विचारात घेऊन वरिष्ठाकडून या यादीत या.लोकांचा सहभागी करून घ्यावा. त्यात मध्ये ओबिसी समाजासाठी हि योजना गेल्या दहा वर्षे पासुन बंद असल्यात जमा होती.ग्रामीण भागात घरकुल ओपण ओबीसी चेघरे झाले नाही फक्त मागील वर्षी पंतप्रधान घरकुल योजना ब ‘ची घरेच सुरु झाले आहेत त्यामुळे खुला प्रवर्ग, ओबीसी समाजातील गरीब लोकांना आता ह्या योजणेपासून खुप अपेक्षा आहे आपल स्वतः च हक्काच घर पण ते ह्या आँनलाईन यादीत समावेश झाला नाही तर याच्यांमध्ये रोष तयार होईल म्हणून. हे नावे आँनलाईन यादीत घ्यावी हि विनंती राताळी सरपंच सौ अलका लव्हळे यांच्या वतीने करण्यात आली आहे .

Leave a Comment