येऊलखेड व चिंचखेड येथील सरपंच, उपसरपंच व ग्रापं सदस्यांचा भाजपात प्रवेश

  • इस्माईल शेख शेगाव

आमदार एडवोकेटआकाश फुंडकर यांच्या हस्ते भाजपचा दुपटटा घालून सत्कार
मतदार संघातील मौजे येऊलखेड व चिंचखेड ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला असून या ग्रामपंचायतवर सरपंच पदी श्री सदानंद रा.पुंडकर तर उपसरपंच पदी श्री रविंद्र पि.फरपट व चिंचखेड सरपंच पदी मनकर्णा महादेव डुकरे व उपसरपंच पदी नारायण सुभाष भांबेरे हे विजयी झाले आहेत.

या नव नियुक्त़ सरपंच उपसरपंच व ग्रामपचांयत पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते भाजपाचा दुपटटा घालून सत्कार करण्यात आला.

येऊलखेड येथील सरपंच सदानंद सा.पुंडकर, उपसरपंच रविंद्र फरपट, सदस्य़ केशव पुंडकर, सदस्य़ विशाल हिवराळे, तसेच सुनिल आळशी, बाबुराव हनवते यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला.

तसेच चिंचखेड ता.शेगांव उपसरपंच नारायण सुभाष भांबेरे, आशिष सापुडा भांबेरे सदस्य़, विद्या पुरुषोत्त़म भांबरे, सदस्य़, रविंद्र महादेव डुकरे, या नवनियुक्त़ सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. यावेळी गोविंदा मिरगे जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र देवचे जिल्हा सचीव, सुरेश गव्हाळ ता.अध्यक्ष खामगांव, शेखर कडाळे शकतीकेंद्र प्रमुख, श्यामसुंदर पुंडकर यांच्यासह ॲड प्रविण कडाळे सरपंच तरोडा डी, योगेश पिसे सरपंच पाडसुळ, प्रकाश विठठलराव गायकवाड, डॉ आघाडी प्रमुख, अनिलभाऊ मेटांगे, श्रीधरभाऊ पुंडकर, यांची प्रमुख उपस्थ‍िती होती.

Leave a Comment