युवासेना उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची निवड*

 

 

इस्माईल शेगाव  प्रतिनिधी

आगर:-युवासेना अकोला उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची नियुक्ती करण्यात आली असून,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे युवासेना सचिव वरुन सरदेसाई शिवसेना संपर्क प्रमुख श्री. प्रकाश शिरवाडकर याच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री. नितीन देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गोपाल दातकर तसेच युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनात ओम साकरकार यांची नियुक्ती करण्यात आली. अंशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण या विचारातुन कार्य करावे व तसेच या पदावरून जनतेच्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून द्यावा तसेच जन कल्याणकारी कार्य करुन पक्षाची प्रतिमा उचावण्यास हातभार लावावा.

असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर यांनी ओम साकरकार यांना नियुक्ती पत्र देताना अकोला येथील शासकीय विश्राम गृहामध्ये केले.यावेळी नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख व युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे, विशाल घरड,आदित्य चावरे,उज्वल काळणे,शुभम चावरे,अतुल साकरकार, गोपाल निवाणे,चेतन गोरले,पंकज वासनकार,लकी गावंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ओम साकरकार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय सर्व पदाधिकारी व सर्व तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.

Leave a Comment