यावल तालुक्यात घातक रसायन व्दारे बनविलेल्या पन्नीच्या दारूची खुलेआम विक्री अनेक तरुणाच्याआयुष्याची राखरांगोळी

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात मानवी जिवनास अपायकारक अशा अत्यंत विषारी पदार्थाने बनविलेल्या पन्नीच्या दारूचा सर्वत्र महापुर आल्याचे दिसत आहेत या पन्नीच्या दारूमुळे अनेकांचे कुटुंब व आयुष्य उद्धवस्त झाले असुन अनेकानी यमलोग गाठले असुन राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस प्रशासनाने तात्काळ या पन्नीच्या दारू विक्रीवर ठोस अशी कारवाई करीत कायमचे प्रतिबंध घालावे.

अशी मागणी मोठया प्रमाणावर महिला वर्गाकडुन करण्यात येत आहे . यावल तालुका हा जळगाव जिल्ह्यात आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो , ८५ गावे असलेल्या या तालुक्यात मोठया प्रमाणावर राहणारे गोरगरीब नागरीक मोलमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात , मात्र मागील गेल्या दोन ते तिन वर्षापासुन तालुक्यात विषारी घातक रसायन मिश्रण करून पन्नीची दारू तयार करण्यात येवुन शहरी भागातील काही ठरावीक ठीकाणी तर ग्रामीण भागात सार्वजनिक ठीकाणी खुलेआम या पन्नीच्या मानवी जिवनास धोकादायक दारूची विक्री करण्यात येत आहे

, अगदी सहजपणे मिळणाऱ्या या पन्नीच्या दारूमुळे मोठया प्रमाणावर लहान मुलांपासुन तर विद्यालयीन तरुण वर्ग आकर्षक होवुन या दारूच्या आहारी जात व्यसनाधिन होत असल्याने त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन अनेकांचे कुटुंब उघडयावर आले आहे , याविषारी घातक रसायनाच्या पन्नी दारूमुळे अनेक तरूणांचा दुदैवीरित्या मृत्यु झाला असुन, अनेक मृत्युच्या वाटेवर आहे .

राज्य उत्पादन शुल्क व पोलीसांच्या कार्यवाहीत सातत्य असावे , या पन्नी दारू विक्रीच्या प्रसारमाध्यमा मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले की , प्रशासनाकडून थातुरमातुर देखाव्याची कारवाई करण्यात येते तसे न होता पन्नीची दारूही कायमची हद्दपार झाली पाहिजे अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.

Leave a Comment