अनेक संघटनेच्या वतीने भोजन दान !
आज शुक्रवारी क्रांतीवीर शहिद बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिना निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहातील शहिद स्मारक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सिध्दार्थ मेश्राम, या शिवाय संगीता येरमे, बंडु पेंदाम, सावन उईक, रवि मेश्राम, दिवाकर मेश्राम, सुनिल मेश्राम, साईनाथ मडावी, कार्तिक कोडापे, रमेश उईके, सविता दंडारे, आशा देशमुख, विश्वजित शाहा, हेरमन जोसेफ, तापोष डे, देवा कुंटा, कल्पना शिंदे, किशोर बोलमवार, वैशाली मद्दीवार कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागातील इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
🟨🟪शहिद विर बाबूराव शेडमाके यांची पुण्यतिथी शहिद दिन म्हणून साजरी केल्या जाते. या वर्षीसुद्धा समाज बांधवांच्या वतीने शहीद दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कारागृह येथील त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आज उपस्थित झाले आहे.या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन आदरांजली अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.
दरम्यान शहिद दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आज नागरिकांना या ठिकाणी मसाला भात व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.🟨🟪सुर्या मराठी न्यूज साठी चंद्रपूरवरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे🟨🟪