मातोश्री महिला महाविद्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीताने स्वराज्य महोत्सवाची सुरूवात

0
166

 

मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट व विद्या विकास उच्च प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट चे संयुक्त आयोजन,,

हिंगणघाट मलक नईम

मातोश्री कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक राष्ट्रगीताने स्वराज्य महोत्सवाची दिमाखात सुरूवात करण्यात आली प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे यांची उपस्थिती होती
क्रांती दिनाच्या पर्वावर स्वातंत्र्य योध्यांना मानवंदना देवून शासन आदेशानूसार सकाळी ठीक ११ वाजता राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला, प्रसंगी अतिथी नितेश रोडे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी आजच्या काळात बदलत्या परिस्थितीत स्वातंत्र्याचा अर्थ बदलतो आहे त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने वागून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणाऱ्या सर्वांच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वातंत्र्याचा स्वैराचार न होऊ देता आचरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली
संचालन प्रा अभय दांडेकर तर प्रास्तावीक प्रा सपना जयस्वाल तर आभार प्रा अजय बिरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय चे सर्व शिक्षक शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here