विकी वानखेड़े यावल
मौजे कोरपावली येथे पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे माजी आमदार चंद्रकांत दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामाचे उद्घाटन .
माजी आमदार माननीय चंद्रकांत दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपावली येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गावामध्ये माननीय आमदार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने धुमधडाक्यात स्वागत गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सदरील काम हे पाटील वाडा परिसरात असून अंदाजित किंमत ही 5 लक्ष आहे. सदर कार्यक्रमास सरपंच विलास अडकमोल, मोहराळा सरपंच नंदा गोपाळ महाजन, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, जुम्मा तडवी, शाखा अध्यक्ष भरत चौधरी शाखा उपाध्यक्ष प्रविण अडकमोल, अविनाश अडकमोल, भिमराव इंधाटे, किसन तायडे, समाधान अडकमोल, मनोज अडकमोल, अजय अडकमोल, उमेश जावळे, गजानन कोळी, सूर्यभान पाटील, भरत चौधरी सर, प्रकाश कोळी, समाधान कोळी, अरुण भालेराव, विक्की अडकमोल, सचिन भालेराव, माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाटिल, दत्तात्रय महाजन, युगल पाटील, प्रमोद महाजन, विनायक पाटील विशेष करून या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. तसेच या विकास कामांच्या प्रसंगी माननीय आमदार लताताई सोनवणे तसेच माजी आमदार चंद्रकांत दादा सोनवणे यांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सरपंच विलास अडकमोल यांनी आभार मानले. तसेच विकास कामांचे उद्घाटन झाल्याने संपूर्ण गाव हे माननीय आमदारांचे कौतुक करत आहे.