बांधकाम मालक आणि न.प अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या चर्चेला उधान..
प्रशासनाच्या तिजोरीस चुना लावणारे अवैध बांधकाम करणारे महाशयाची वाढली मजल..
मलकापूर:- बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.तर धक्कादायक म्हणजे या ठिकाणी नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता तब्बल ५ महिन्यांपासुन हे बांधकाम सर्रास पणे सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आल्यावर ही बांधकाम मालक हा नगर पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना न जुमानता आपले बांधकाम न थांबवता अतिशय जलद गतीने उरकवत आहे.एवढेच नव्हे तर या महाशायाने आपल्या जागेसमोर असलेला नवीन सिमेंटचा सरकारी रस्ता खोदुन त्यावर बांधकामासाठी लागणारी लिफ्ट उभी केली आहे,
नगर पालिका प्रशासनाकडे यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं या प्रकरणी अधिकारी व बांधकाम मालकांमध्ये साटलोट असल्याची चर्चा आता शहरात जोरात रंगू लागली आहे.तर नगरपालिका या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करून आपला हटोडा चालवणार का…किंवा साटेलोटे असल्याने दुर्लक्ष करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…
तर शहरातील सिंधी कॉलनी येथील चांडकाई यांचे गेल्या 5 महिन्यांपासून घरांचे बांधकाम सुरू आहे.याप्रकरणी नगरपालिकेमध्ये दोन तक्रारी देखील दाखल झाल्या आहे.मात्र या प्रकरणी अद्यापही या अवैध बांधकाम मालकावर कारवाई होत नसुन नगर पालीका या कारवाई कडे डोळेझाक का करित आहे.असा प्रश्न आता सर्वसामान्यातुन ऐकायला मिळत आहे.तर याप्रकरणी न.प.अधिकारी यांना विचारणा केलि असता आम्हाला ईतरही कामे असतात. वेळ मिळाला तर नक्कीच कारवाई केली जाईल होईल.आपणही मला काम करू द्यावे.अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत वरीष्टांचे आदेश नसल्याचे सांगत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय…तर न.प या बांधकाम मालकावर कारवाई का करीत नाहीये याचे कारण मात्र उद्यापही गुलदस्त्यात आडकुन असलं तरी मलकापूर नगर पालिका ही चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठीच आहे का असा सवाल उपस्तीत होत आहे,