सरपंच यांचे एस .डी.ओ.यांना निवेदन.
आष्टी तालुक्यातील मौजे भिष्णूर येथील रेतीघाट लागू असून मशिनच्या साह्याने उत्खनन चालू आहे. याबाबत तहसीलदार व तलाठी यांना पत्र देऊन व तोंडी सूचना देऊनही उत्खनन सुरूच आहे. त्यामुळे जनावरांना पाणी पिण्याकरता अडचण होत आहे.व महसुलचे नुकसान होत आहे. तरी याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी. अशा प्रकारचे निवेदन भिष्णूर ग्रामपंचायतचे सरपंच यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मौजे भिष्णूर येथे रेतीघाट लागून या रेती घाटाला लागूनच मौजे चांदुर ढोरे ता. तिवसा जि अमरावती येथील रेती घाटाचा लिलाव झालेला आहे. सदर ठिकाणी मशिनच्या साह्याने रेती उत्खनन चालू आहे. परंतु सदर मशीनद्वारे भिष्णूर येथील रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात करीत आहेत. सदर उत्खननाची माहिती दि. 11/ 2 /2022 रोजी तहसीलदार आष्टी यांना लेखी पत्र देऊन व तलाठी आठवले यांना सुद्धा तोंडी सूचना देऊन माहिती देवूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्याकरता हे पत्र देत आहोत .तरी आपण सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. या उत्खननामुळे जनावरांना पाणी पिण्याकरता अडचण निर्माण होत आहे. तसेच भिष्णुर येथील महसूलचे सुद्धा नुकसान होत आहे. सदर निवेदनाच्या प्रति ह्या महसूल मंत्री ,पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविल्या असून निवेदनावर सरपंच ग्रामपंचायत भिष्णूर यांची सही आहे.