बी टी कापसावर बोंड अळी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील बहुतांश गावात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्यास्थितीत हवामानात बदल झाल्याने कापूस पिकावर बोंडअळींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे . सुरूवातीला अतीपावसामुळे कपाशी बोंडे काळे पडून कापसाचे नुकसान झाले , कापूस वेचणी केल्यानंतर वेचणीची मजुरी अन व्यापाऱ्यांनी पडक्या भावात कापूस खरेदी केल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे . सध्यास्थितीत कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे .

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसारखी कापूस उत्पादक शेतकरीची स्थिती आहे . कपाशीवरील निम्यापेक्षा जास्त बोंडावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यात अतिवृष्ठी होऊनही महसूल व कृषिविभानेचा अहवाल निरंक पाठविल्याने राज्य शासनाने देऊ केलेली शासकीय मदत तोडकी का असेना परंतु , संग्रामपुर तालुक्यातील शेतकऱ्यांनावर शासकीय मदती पासून वंचित ठेवल्याची ओरड होत आहे . कपाशिवर बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन तिन वेचणीतच उलंगवाडी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे . बोंडअळी आल्याने कापसाचे बोंडे खुलुन येत नाही , त्यामुळे महिला मजुर वेचणी करण्यास येत नाही . बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि संचालकांच्या व स्वताच्या अनुभवानुसार रासायनिक फवारणी करुनही बोंड अळी कपाशीवर कायम असल्याने बहुताश शेतकऱ्यांनी कपाशीवर तणनाशक रासायनिक फवारणी केली . त्यामुळे बोंडे सडत असल्याने कापूस उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिविभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन , शासनाकडून ठोस उपाय योजना व मदतीसह पीकविमा मदत देऊन दिलासा देणे गरजे आहे .

Leave a Comment