जळगाव :-पल्लवी कोकाटे
जळगांव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील रहिवाशी गजानन भाऊ कोकाटे यांचे चिरंजीव रोशन कोकाटे यांनी तालुक्यात बहुजन समाजातील पहिला सि. ए. होण्याच्या मान पटकावला त्याबद्दल आज रोशन चा सत्कार करण्यात आला। यावेळीं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, सुभाषराव कोकाटे, संतोषबाप्पू देशमुख, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा कार्याध्यक्ष पराग पाटील, रा. कॉ चे तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, ता. कार्याध्यक्ष महादेव भालतडक, आशीष वायझोडे, दत्ता डीवरे, अनंता कोकाटे, निखिल पाथ्रीकर यांनी सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।