“फि” माफ करतो म्हणत वकीलाचा महिलेवर बलात्कार

 

आयुषी दुबे शेगाव तालुका प्रतिनिधी

शेगांव : अकोल्यातील वकीलाने जमीनी संदर्भातील केसची फी माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

जमीनी संदर्भातील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे पिडीत महिलेने दिले होते. संबधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकीलाने पिडीत महिलेसोबत विविध ठिकाणी जात होते त्यामुळे त्यांचा परिचय वाढल्याने वकील हा पिडीत महिलेच्या घरी जात होता. वकील व पिडीत महिला हे २०१६ पासुन एकमेकांच्या संपर्कात होते. २०१६ ते २०२० यादरम्यान वकील प्रविण तायडे याने शेगांव येथील हॉटेल साई गजानन बुक केले व पिडीत महिलेला केस बद्दल चर्चा करू असे म्हणुन लॉजवर नेले व तुम्हाला फि माफ करतो असे म्हणुन जवळ येऊन पिडीत महिलेशी जबरदस्ती करू लागल्याने पिडीत महिला आरडाओरडा करु लागली असता जिवे मारण्याची धमकी दिली व शारीरिक संबंध केले. यावरुन पिडित महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आरोपीविरुद्ध अ.प.नं ३९६/२० कलम ३७६(२)(N) ५०६ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे हे करीत आहेत.

Leave a Comment