पंतजलि योग परिवार बुलडाणा जिल्हाच्या वतीने  संतनगरी शेगांव मध्ये पत्रकारकार दिन साजरा

 

इस्माईल शेख शेगाव

शेगांव आज 6 जानेवारी 2023 रोजी संतनग गवरी शेगांव तथा तहसील मधील पत्रकारांचा पतंजलि योग परिवार बुलडाणा जिल्हाच्या वतीने भट्टड जीन शेगांव येथे सकाळी 11 ते 3 या वेळात सतकार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मधुकरराव बगे साहेब होते.

चिन्मय विद्यायलय शेगांवचे प्राचार्य किशोरजी कुळकर्णी यांचे शुभहस्ते तर नानासाहेब कांडलकर दै. लोकमत तालुका प्रतिनिधी जळगांव जा., दिलीपजी इंगळे से.नि. गटविकास अधिकारी, डॉ. ज्ञानेश्वरजी मिरगे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त से.नि. केंद्रप्रमुख, हरिभाऊजी पाटील माजी मंडळ प्रभारी, राजुभाऊ शेगोकार समाजसेवक, प्रल्हादजी सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष, रोहीत आर्या फिल्ममेकर मुंबई हे प्रमुख अतिथी लाभले होते.

कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व गायत्री माता, श्री संत गजानन महाराज व आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत राज्यपुरस्कारप्रात से.नि. मुख्याध्यापक प्रकाशजी झामरे यांच्या सुरेख स्वागतगिताने झाली. त्यांच्याच सुरेख आवाजात शेवटी पसायदान झाले. आकाश तायडे यांनी तबल्याची साथ दिली.

पतंजलि परिवाराच्या पदाधिकार्‍यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. प्रास्ताविक प्रल्हाद सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष यांनी केले. त्यानंतर पत्रकार बांधवांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन प्रकाशजी झामरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दिपकजी सरप यांनी करून दिलाा. मान्यवरांच्या शुभहस्ते संतनगरीमधील व शेगांव तालुक्यातील 60 पत्रकारांचा सत्कार सन्मानपत्र, मोमेंटो, टी शर्ट, अंगवस्त्र देवून करण्यात आला.

त्यामध्ये दैनिक साप्ता. सोशल मिडीया सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. किशोरजी कुळकर्णी, डॉ. ज्ञानेश्वरजी मिरगे ह्यांची पत्रकार दिनानिमित्त भाषणे झालीत. काही विशेष सत्कार करण्यात आले. त्यामध्ये नानासाहेब कांडलकर, प्रकाशजी झामरे, नितीनजी वरणकर सर, रमेशजी भट्टड, विठ्ठलराव मिरगे यांचे पतंजलि परिवाराला विशेष सहकार्य मिळत असल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सत्काराला उत्तर महेंद्रजी व्यास आवाज व व नानारावजी पाटील दै. तरूण भारत यांनी दिले.

अध्यक्षीय भाषण मधुकररावजी बगे यांचे झाले. त्यामध्ये त्यांनी योगासंबंधी सुक्ष्म मागदर्शन केले. आभार प्रदर्शन मोहन पिंपळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृक्षमित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरविलेले अध्यापक विठ्ठलराव मिरगे यांनी केले. प्रल्हाद सुलताने यांच्या शांतीपाठाने सभेचा समारोप झाला. नितिनजी वरणकर सरांच्या कवितेने सगळ्यांचे हास्याससन झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दशरथ लोणकर, पुरूषोत्तम पाटील, हरिदास सोळंके, विनायक भारंबे, सौ. सुनिताताई चांडक, सौ. वर्षाताई सरप, बाबुराव रोकडे, ज्योतीताई लांबे, सविताताई इंदोरे, संगीताताई, कल्पनाताई मसने, निळकंठजी साबळे, दिपक सरप सर, रतन बगे, चिंचोलकर सर, डॉ. निवृत्ती इंगहे, गोपाल तायडे, विनोद वायझोडे, वसंतराव डोंगे, दिलीप गोहेल, अरविंद इंगळे, गजानन पोटे, गणोरकर, उज्वल दळवी, कमलाकर चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यातील योगसाधक साधिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
**************

Leave a Comment