नवरात्री आणि नवं अवतार उत्सव नवरात्रीचा जागर विचारांचा …

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा

धर्म शास्त्रानुसार आपण आज नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो याबद्दल आक्षेप घेण्याचे किंबहुना किंतू परंतु असण्याचे कारण असूच शकत नाही. परंतु जगतगुरु तुकाराम महाराज ज्या प्रमाणे म्हणतात ,*सत्य सत्याशी मन केले ग्वाही मनियले नाही बहुमता* याच आधारे नवरात्री उत्सव आणि नवं दुर्गा उत्सव साजरा करताना आपण या जगाला नाही तर विश्वाला एक विचार देऊन ज्यांनी स्त्रियत्वाची कल्याणकारी प्रेरणा निर्माण करत काळानुसार त्या त्या वेळी घेतलेली भूमिका आणि त्या सोबत केले समर्पण ,त्याग , अन्याय विरुद्ध चे बंड आणि त्यातून घडलेली नवक्रांती हे आज प्रत्यक्ष जागर घडवून आणणे आणि उत्सव नवरात्राचा जागर विचारांचा असे म्हणतात येईल , आज गाव खेड्या पासून तर मोठ मोठ्या मेट्रो सिटी पर्यंत आपण हा उत्सव साजरा करत असताना कुठे आई जगदंबेचे मंदिर असतील तिथे नवरात्र उत्सव असतोच बऱ्याच ठिकाणी नवदुर्गा उत्सव मंडळ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात या सोबतच थोडासा आपण वरील हेडलाईन् प्रमाणे विचार केला तर ?
आज नवरात्री उत्सव म्हणजे महिलांची खूप मोठी लगबघ असते मंदिरात असू दे नाहीतर मंडळात असू दे , त्यांचे उपवास , कलर कोड ड्रेस ,गरबा,आणि त्यांची भावपूर्ण भक्ती ,पण थोडंसं भक्ती शक्तीचा जर संजोग घडला तर आज समाजातील सोशीत, वंचित, पीडित ,महिलांना सक्षमता आणि आत्मनिर्भर होण्यास मदत होईल यात शंका नाही , आता भक्ती शक्ती चे दर्शन कसे घडेल ज्या प्रमाणे आई जगदंबेचे नवं अवतार म्हणून आपण वेगवेगळी रूपे आणि कथा ऐकल्या त्याच सोबत या नऊ दिवसात कर्तुत्वाने आणि आपल्या कार्याने महान असणाऱ्या क्रांतिकारी विचार घेऊन अवघे विश्वाची माझे घर म्हणत ज्यांनी तुमच्या माझ्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून कार्य केले त्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या विचारांचा जागर झाला तर आज समाजात बदल घडेल आणि त्यांनी केलेल्या कार्याला आपण मानवंदना देऊ यात दुमत नाही , जेव्हा जेव्हा दानवण या धरतीवर उत्मात करत तेव्हा तेव्हा आई जगदंबे ने त्यांचा नाश केला , हाच विचार घेऊन आपण भक्ती भावाने आज त्यांचे पूजन करतो ,तसेच आजच्या युगात जेव्हा जेव्हा या धरतीवर महिलांवर अन्याय झाले अत्याचार झाले येवढेच नाही तर एखादे साम्राज्य संपण्याच्या मार्गावर असताना क्रांतीची मशाल घेऊन याच स्त्रीने जेव्हा विचारातून क्रांती केली त्यांचा जागर या नऊ दिवसात होयाल पाहिजे की नाही हे आपण ठरवू शकतो, म्हणून आज आपण बघत आहोत सरकार ने महिलांना ५०% आरक्षण दिले , नव्हे तर महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज देशाच्या कारभारात उभ्या आहेत ,आज असे एक ही क्षेत्र नसेल त्यात महिला नसतील ,हे खूप अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे , पण आज ह्या सगळ्यात कुठे तरी कोणी महिला जळून मरत असेल , कुठे तरी मुलगी झाली म्हणून गर्भातच तिचा बळी जात असेल , कुठे तरी सासरी सासुरवास असेल , कुठे तरी एकट्या मुलीला बाहेर भीती वाटत असेल , कुठे बलात्कार घडत असेल तर कुठे जिवंत ही जाळले जात असेल तर आजची परिस्थिती बघून गरज आहे ती भक्ती शक्तींनी परिपूर्ण सक्षम आत्मनिर्भर बनण्याची त्यासाठी उत्सव नवरात्रीचा आणि जागर विचारांचा असे मी म्हटले आहे , आज गरबा ,असू दे नाहीतर त्यासोबत महिलांचे विविध खेळ असू दे यावर मी टीका करणार नाही कारण त्यांना ही कधी वेळ मिळायला हवा पण ,आज भक्तिभावाने हे व्रत करत असताना शक्तीभाव जागृत करण्याची अनुभूती कशी घडेल हे महत्त्वाचे आहे , मग आता विचार करू आपण भक्ती सोबत शक्तीचा आजही आपण सुखाने श्वास घेत आहोत आणि स्वराज्यात जगत आहोत या स्वराज्याच्या जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब ज्यांनी या देशाला एक नव्हे तर दोन छत्रपति घडून दिले ज्यांनी स्वतंत्र ,समता ,न्याय , बंधुता विचार रुजवून छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली नव्हे तर स्वराज्य स्थापन करण्यात फार मोलाचे योगदान देऊन सर्वसामान्याच्या मनात अन्ायाविरुध्द पेटून उठण्याची जिद्द ज्यांनी आमच्या मनामनात निर्माण केली त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ,माझा पुत्र गेला तरी बेहत्तर पण सर्वसामान्यांचे स्वराज्य उभे झाले पाहिजे इथली प्रजा ही सुखी आणि समृद्ध निडर असावी असे स्वराज्य शिकवण देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता मासांहेब जिजाऊ यांना पहिला वंदन ,
चुल आणि मूल या अंधश्रधेतून बाहेर पडून ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या दारा पर्यंत पोहचून शिक्षणाचे महत्व पटवून दिले ,आज गावाचा कारभार करणाऱ्या सरपंच असो की देशाचा कारभार करणाऱ्या राष्ट्रपती असोत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला त्या साठी त्याग समर्पण करून शिक्षण रुपी अलंकार देऊन सक्षम केलं त्या सावित्रीमाई फुले ,यामापासून प्राण वाचवनाऱ्या सावित्री भक्तीच दर्शन तर शिक्षणाचे धडे देणाऱ्या सावित्रीमाई भक्तीच दर्शन होय ,
यशस्वी पुरुषा मागे एक कणखर स्त्री असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माता रमाई भीमराव ते बाबासाहेब हा खडतर प्रवास घडत असताना ज्या बाबासाहेबांसोबत ज्या खांद्याला खांदा लाऊन उभ्या होत्या त्या माता रमाई जेव्हा देशाचा कारभार बाबा साहेब करत होते तेव्हा त्यांचा सोन्याचा संसार करून त्याग समर्पण आणि परिस्थिती सोबत दोन हात करून खाबिर राहिल्या त्या माता रमाई यांना वंदन .
अनिष्ट्र रूढी परंपरा अंधश्रधदेला न जुमानता ,सती न जाता एका हातात शास्त्र तर एका हातात शस्त्र घेऊन २९ वर्ष राज्यकारभार चालवणारी स्त्री म्हणजे माता अहिल्या राणी होळकर ज्यांनी स्त्रियांची पहिली फौज उभारून त्यांना संरक्षणाचे धडे देऊन तटस्थ केलं असा गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या माता अहिल्याबाई होळकरांना वंदन .
राजा संपला म्हणजे त्याचे राज्य संपते या वाक्याला पुरेपूर उधळून लाऊन औरंगजेबाचे नीच विचार तिने सह्याद्रीच्या मातीत तुडवले आपला मान अभिमान आणि स्वाभिमान ज्यांनी कायम ठेऊन ज्यांनी स्वराज्य पुढे नेले दिल्ली झाली दीन वानी दिल्लिषास गेलं पाणी राम राणी ताराबाई भद्रकाली कोपली ,शुर कर्तव्य दक्ष स्वराज्याच्या रणरागिणी महाराणी ताराराणी यांना वंदन .
रामा सोबत सीतेला १४ वर्ष वनवास घडला पण त्यापेक्षा जास्त २९ वर्ष स्वतःच्या आयुष्याचे अग्निकुंड करून निस्वार्थ आणि त्यागाची भूमिका असणारे उत्तम उदाहरण म्हणजे महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराज गडावर नसतानाही स्वराज्याची मान उंच ठेवणाऱ्या स्वराज्याच्या रणरागिणी महाराणी येसूबाईना वंदन .
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे पाय ओढते त्यापेक्षा एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या मदतीला उभी राहते तेव्हा ती फातिमा शेख होते स्त्री शिकली म्हणजे पाप होते ही लोकांच्या बुध्दीला लागलेली कीड काढण्याचं काम करत स्त्री शिक्षणाचे महत्व समजून सावित्री माई सोबत ज्यांनी स्त्री शिक्षांतून आपला उद्धार केला त्या जगातील पहिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांना वंदन .
कधी आमच्यावर प्रेम करणारी जन्म देणारी आई होते तर कधी आमच्यावर संस्काराची पेटी बनणारी आजी होते कधी आमच्या सुख दुःखात साथ देणारी बहिण ,मैत्रीण होते तर कधी आमचे रुसवे फुगवे काढणारी आत्या किंवा मावशी होते ,प्रतेक घटकात विभागलेली ही स्त्री आमच्या साठी कायमच महत्त्वाची ,गृहिणी पासून तर रोज नात्यांच्या बांधनाना रोज नव्या आव्हानांना पेलते ही ही आहे म्हणूनच हे जग इतके सुंदर आहे अश्या सर्व कर्तृत्ववान स्त्री ला वंदन
ही काही ठराविक ज्वलंत उदराहान आहेत ज्यात भक्ती सोबत शक्तीचे दर्शन घडते ,आता जागर विचाराचा घालत असताना अश्या वैचारिक व्याख्यानमालेचे आयोजन असू दे किंबहुना अश्या असंख्य प्रेरणा दाई स्त्रियांचे उदाहरण नऊ दिवसात आपण कश्या पद्धतीने प्रचार प्रसार करू याचा प्रयत्न असू देत म्हणजे आज परिवर्तन घडेल यात शंका नाही , आज ऑफिस मध्ये काम करणारी स्त्री असेल आणि तिला तिथे काम करताना भीती वाटत असेल , आज एखाद्या रस्त्याने एकटी स्त्री जात असेल आणि तिची अब्रू लुटल्या जाऊन तिला मारणे असेल , त्याहूनही आज स्त्रीभ्रूण हत्या असेल तर आपल्या मधील एक मोठी अंधश्रद्धा असल्याचे जाणवते ,ज्या स्त्री ने आपले सौभाग्य घालवले त्यांना तर संसररुपी सर्वच गोष्टीपासून दूर कीव वेगळे ठेवले जाते ,आज नवरात्री उत्सव साजरा करत असताना आपल्याला कळायला पाहिजे ,एखादा शेतकरी आत्महत्या करून आपले जीवन संपवत असेल किंवा एखादा जवान आपली देश सेवा करताना शहीद झाला असेल किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर त्या स्त्री चे आयुष्य ही संपल्या सारखेच असते म्हणजे त्यांना या सगळ्यापासून उत्सवात कुठे ही स्थान दिसत नाही , मग ती ही एक स्त्री आहे मग तिचा गौरव का म्हणून आपण करू नये हा प्रश्न सातत्याने मनात येतो ? *जगतगुरु तुकाराम महाराजांच्या उपदेशाप्रणने आज वेदात उपनिषधात म्हटल्या प्रमाणे आपण सगळे एकाच ब्रम्हतत्वतून निर्माण झालेले आहोत आणि शेवटी त्यातच विलीन पावणार आहोत तर हा भेदा भेद कशासाठी ,अवघी एकाचीच विन तेथे कैसे भिन्न भिन्न* तुकाराम महाराज यापुढे जाऊन असे ही म्हणतात *ब्राम्हण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार पाळे नरा नर आधी करून वेश्याही* सर्वांना नामसंकीर्तन करून परमेश्वरा जवळ जाण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण स्त्रियत्वात दैवी चे रूप बघत असु तर आयुष्यात त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे आणि हा सन्मान नऊ दिवसाचं नाही तर कायम असायला हवा हे फार महत्त्वाचे आहे , परंतु आजही या जगात विरोधाभास आणि काही नीच विचाराचा म्हैशासुर मारण्यासाठी गरज आहे आम्हाला भक्ती सोबत शक्ती चा जागर घालण्याची , छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आम्ही महाराष्ट्र बघत असू तर, एकटी मुलगी संधी नाही तर जबाबदारी आहे , क्षात्रूच्या सैन्यातील स्त्री ही आपली बहीण आहे हा विचार राजांनी आम्हाला दिला आहे , आई जगदंबेची तुळजाभवानीची ,शिवरायांनी केलेली भक्ती आणि शिवराय यांच्या विचारातून मिळालेली शक्ती हे आपल्याला प्रेरणादायी आहे , म्हणून हा भक्तीचा उत्सव शक्तीची साथ देऊन साजरा करता यावा , यासाठी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार असतील , निराधार महिलांना. मदत असेल , मुलींना येणाऱ्या काळात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटे , लाठी काठी , ड्रायव्हिंग , याहून पुढे जात गरजू आणि हुशार गरीब घरातील मुलींना शिक्षणासाठी मदत ,मुलींना विविध मार्गदर्शन शिबिर ,असे उपक्रम ही राबवणे ही काळाची गरज आहे , नवरात्रीचे शेवटच्या दिवशी नऊ कन्या जेवण करतात तेव्हा त्यांना शालेय साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन देणे , शहीद जवानाच्या पत्नीचा सत्कार असेल ,शेतकरी आत्महत्या ग्रस्थ महिलेचा सत्कार असो ,अश्या पद्धतीने खूप काही उपक्रम आपण राबवू शकतो , गरबा खेळणे , काही खेळ खेळणे आणि मोठे बँड लाऊन मिरवणुका काढणे हे ठीक आहे पण त्यासोबतच या विचारांचा जागर झाला तर ?
असो तूर्तास येवढेच की व्हिडिओ आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून सगळे मांडणी करत असतात, पण काहीना कळतं तर काहींना कळून हि वळत नाही असो नवरात्रीचे औचित्य साधून वरील काही विचार आम्ही व्हिडिओ चे माध्यमातून प्रसारित केलेत त्यांना बरीच वाव मिळाली अनेकांनी स्टेटस ठेवले अनेकांना आवडले शेवटी आम्ही लेखनाच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला आणि आज लेखणी हातात घेतली , परंपरेतील सर्वच स्वीकारावं असा नसते, वेदांचा तो अर्थ अम्हसिस ठावां येरव्हणी वाहवा भार माथा असे तुकोबा राय लिहतात ,परंपरेत अडकून नबसाता अंधश्रध्देच्या बळी पडतात म्हणून परंपरे सोबत बदल ही आवश्यक असतो ,आणि थोडा काही बदल होऊन जर परिवर्तन होत असेल आणि ते ही आपल्या साठी सुखकर असेल तर आपण कानही करावं हा शेवटी प्रश्न ?
संकल्पना / व्हिडिओ
प्रगती पाटील मिरगे माटरगाव

विठ्ठल पाटील अवताडे शेगाव
लेखन / संकलन

Leave a Comment