दि.मतदार टाईम्स चे तालुका प्रतिनिधी राहुल निर्मळ यांना अवैध गुटखा माफिया कडून आसलगांव येथे मारहाण…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यामध्ये अलीकडील काळात अवैध धंद्यांना उत आल्याचे दिसत आहे
त्यामध्ये अवैध गुटखा, वरली,मटका, सट्टेबाजी अवैध दारू धंदे जोमात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तसेच या सर्व प्रकारांमुळे पोलीस प्रशासनाविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.परिणामी रेती माफियाकडुन अधिकाऱ्यानवर हल्ला, तर अवैध धंदेवाल्यांकडुन पत्रकारांनवर हल्ला होत असल्याचे प्रमाण जळगांव जामोद येथे दिसुन येत आहे. असेच भ्रष्ट पोलिस यांच्या आश्रीत असलेले गुटखा माफियाकडुन पत्रकाराला मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे.
जळगाव जामोद तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की दिनांक 6 सप्टेंबर रात्री नऊच्या सुमारास मतदार टाईम्सचे तालुका प्रतिनिधी राहुल निर्मळ यांना मिळालेल्या माहिती वरून श्रीकांत श्रीकृष्ण भेलके यांच्या अवैध गुटखा विक्रीची टाटा कंपनीची इंडिका गाडीने गजानन दहीकर टुनकी गाडी क्रमांक एम एच 28 6188 या गाडीने गुटका आसलगाव येथे भेलके यांच्या घरी आला असता त्यांचे स्टिंग आँपरेशन करीत फोटो काढीत असताना श्रीकांत श्रीकृष्ण भेलके यांनी अंगावर धावत येत राहुल निर्मळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे राहुल निर्मळ यांचा भ्रमणध्वनी फुटला तसेच त्यांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान होऊन शरीराला मुका मार लागला सदर घटनाक्रम चालू असताना गावकरी धावून आले नाही तर श्रीकांत भेलके यांनी राहुल निर्मळ यांचा खून करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे करण्यास राहून निर्मळ गेले असता,ASI रमेश धामोडे यांनी एवढ्या मोठ्या गुन्ह्याची नोंद फक्त NC करून घेतली.तसेच ASI रमेश धामोडे यांनी राहुल निर्मळ यांना धमकी देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत अर्वाच्य भाषेत राहुल निर्मळ यांना म्हणाले की रिकामे कामे कशाला करतोस तुला कोणी सांगितले गुटख्याच्या गाडीचे फोटो काढायला.तसेच ASI रमेश धामोडे हे दारू पिल्याचे जाणवत होते ही बाब निवेदनात नमुद केली आहे.सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी व पोलिस अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांनी द्यावे तसेच पुढील आठ दिवसात सदर प्रकरणात आरोपी व पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. सदर प्रकरणात आरोपीला अटक व ASI रमेश धामोडे याची बदली न झाल्यास पत्रकार उग्र आंदोलन करतील तसेच होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदनावर राजेश गजानन बाठे, राजू वाडे, विजय पोहनकर , दत्तू दांडगे,अनिल भगत, अशोक टाकळकर, गणेश भड, गणेश गिर्हे, गजानन सोनटक्के विनोद वानखडे, सागर झनके, राहुल निर्मळ, मनीष ताडे, गुलाबराव इंगळे,विलास बोडखे,अमोल भगत,विनोद चिपडे, आदींच्या सह्या आहेत

Leave a Comment