-पोलिसांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर चालकाला वाचविण्यात यश
– जखमींवर हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नागपूर मार्गावर आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आंजती शिवारात दोन टिप्पर व ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात ट्रक चालक निखिल हरीचंदर वडगावकर वय २४ वर्ष हा ट्रकच्या कॅबिन मध्ये फसून गंभीर जखमी झाला.यावेळी जाम महामार्ग पोलिसांनी दोन तासाच्या अथक परिश्रमाने चालकास ट्रकच्या बाहेर काढून महामार्ग रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघात ट्रकची कॅबिन संपूर्ण चकनाचुर झाली आहे.जाम महामार्ग पोलिसांनी दोन वाहनांना रस्त्याच्या कडेला करीत वाहतूक सुरळीत केली