जिवती येथे अन्नत्याग आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी उपजिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते उपोषणाचा समारोप

✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================
जिवती –

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीतील जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे व अन्य मागण्या घेऊन मागील नऊ दिवसापासून जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती तर्फे अन्नत्याग आमरण उपोषण सुरु होते, या समितीत कोणताही पक्षपात व जातीभेद वगळून सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते,

उपोषणकर्ते सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, शबीर जहागीरदार, विनोद पवार, प्रेम चव्हाण,विजय गोतावळे,लक्ष्मण मंगाम, दयानंद राठोड, मुकेश चव्हाण व बालाजी वाघमारे हे दहा जन मागील नऊ दिवसापासून जिवती येथे अन्नत्याग उपोषणाला बसले होते,

या आंदोलनाची दखल घेत राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दि.14-12-2023 ला नागपूर येथे महसूल विभाग, वनविभाग व जिवती तालुक्यातील शेतकरी बांधव यांना बोलावून बैठक घेतली व सहा महिण्याच्या आत जिवती तालुक्यातील जमीन पट्याचा व इतर प्रश्नांचा हल करू असे आश्वासन दिले

बैठकीत या बैठकीत राजुरा विधानसभेचे आमदार श्री सुभाष भाऊ धोटे श्री संजय भाऊ धोटे श्री सुदर्शन निमकर श्री देवराव भोंगळे इत्यादी उपस्थित होते तसेच उपोषणकर्ते सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, शबीर जहागीरदार, मुकेश चव्हाण, दयानंद राठोड व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाच्या नवव्या दिवशी आज दि.15-12-2023 सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्हाचे उपजिल्हाधिकारी श्री.माने साहेब तहसीलदार श्री सेंबटवड यांच्या हस्ते निंबू पाणी देऊन उपोषणाला समारोप देण्यात आला.

या वेळी तालुक्यातील आजी-माजी सर्व पदाधिकारी व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिवती येथील नगरसेवक सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव पाटील व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचलन प्रा. सावंत सर यांनी केले तर आभार श्री पांडुरंग जाधव यांनी मांनले.

Leave a Comment