चुंचाळे विद्यालयात ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप. मोहरद येथिल शिक्षणाधिकारी राजु तडवी यांचे दातृत्व.

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील चुंचाळे येथिल श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी व १२ वी च्या ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप करण्यात आले.

सदर अपेक्षित हे मुंबई येथे शिक्षणाधिकारी म्हणुन कार्यरत मोहरद येथिल राहीवाशी राजु अमिर तडवी यांच्याकडून मिळाले.मोफत अपेक्षित मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला.

याबाबत असे की,चुंचाळे विद्यालयात दि ३१ रोजी इयत्ता दहावी चे ५०,बारावी चे ६५ असे एकुण ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव जगन्नाथ कोळी यांच्या हस्ते विद्यार्थांना वाटप करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक डी बी मोरे,एम पी वाय वाय पाटील सर ,आर चौधरी,एस एन चौधरी,एन जे पाटील,पी एस सोनवणे,प्रा शारदा चौधरी,प्रा राकेश अडकमोल,प्रा जमिला तडवी,वसतीगृह अधिक्षक चंद्रकांत चौधरी,चौकीदार योगेश सोनवणे,कर्मचारी रविंद्र पाटील,कैलास धनगर,पालक आदी उपस्थित होते

.दरम्यान शिक्षणाधिकारी राजु तडवी यांना विद्यालयातील उपशिक्षक प्रशांत सोनवणे यांनी सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी यांना संपर्क करुन अपेक्षित मोफत उपलब्ध करुन दिले.विद्यार्थांना अपेक्षित मोफत मिळवून दिल्याबद्दल संस्थेकडून सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.

सुत्रसंचलन संजय गोसावी,आभार सुधिर चौधरी यांनी केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

अपेक्षित मोफत मिळाल्याने विद्यार्थांमध्ये आनंद
वर्षभर अभ्यास केल्यानंतर ही अपेक्षित संच बोर्ड परीक्षेला विकत घ्यावे लागते.महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी यापासुन वंचित राहत असतात.

म्हणुन विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत सोनवणे यांनी मोहरद येथिल सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी,प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी यांना संपर्क साधुन मुंबई येथिल शिक्षणाधिकारी राजु तडवी यांच्याकडून सर्व विद्यार्थांना अपेक्षित मोफत मिळवून दिले.

यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.

Leave a Comment