इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव: जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव राज्याचे माजी मंत्री व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे तसेच भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे डी आर एम केडिया साहेब यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले भुसावळ रेल्वे डिव्हिजनचे डीआरएम
शेगाव येथील रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 18 जून रोजी शेगावला आले होते त्यांनी शेगाव येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर खामगाव रोडवर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह सभागृहांमध्ये खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजीव भाऊ कुठे यांच्यासोबत आयोजित पूर्वनियोजित बैठकीसाठी ते विश्रामगृह कडे रवाना झाले.
विश्रामगृह येथील व्हीआयपी सभागृहामध्ये खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय भाऊ कुठे व डी आर एम केडिया यांचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीस स्नेहलता दाभाडे जिल्हा संघटक मंदाकिनी चव्हाण व जिल्हा सचिव शीला सोनेकर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी रेल्वे संबंधी विविध मागण्या
सुद्धा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम दाणे पाटील माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख तालुकाध्यक्ष रामेश्वर धारकर रेल्वेचे उच्च अधिकारी उपस्थित होते