अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
चामोर्शी:-गडचिरोली हा आकांक्षीत जिल्ह्या असून जिल्हा आणि तालुका अधिकाऱ्यांच्या सहकार्याने,चामोर्शी तालुक्यातील काही निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या कैवल्या एज्युकेशन फाऊंडेशनने बेसलाइन मूल्यमापन केले आहे.चामोर्शी तालुका समन्वयक आमीन खान यांनी सांगितले की,हे मूल्यमापन तालुका अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि गांधी फेलो प्राची मेतकर, वैष्णवी खैरनार,हिना खळदकर यांच्या द्वारे १४ जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे भाषा व गणित विषयावर असर टूल आधारित मूल्यमापन करण्यात आले.मुलांच्या मूलभूत साक्षरतेची स्तर मोजण्यासाठी आणि कैवल्या एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यात आणखी योग्य बदल करण्यासाठी,तसेच शैक्षणिक सत्राच्या शेवटी कार्याच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी अंतिम मूल्यमापन घेण्यात येईल असे सांगण्यात आले.