अकोला – अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथे पुलाच्या जवळ कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.मोनू काकड असे मृतकाचे नाव आहे.
शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर येथे निर्माणाधीन पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी मोनू काकड याच्यावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृतक मोनू काकडे याची अपराधीक पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.पूर्व वैमानस्याहून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. हत्या केल्याचे कारण अद्यापही समोर येऊ शकले नसले तरी सिव्हिल लाईन पोलिस अधिक तपास करीत आहेत.