कर्तव्यदक्ष लाईनमनची बदली रदद करा…गांधी चौक विचार मंचची निवेदणातुन मागणी

 

सिंदी रेल्वे ता.१५ : महावितरनचा चार वेळा कर्तव्यदक्ष लाईनमन पुरस्काराचा मानकरी ठरलेला सचिन धोटे यांची नुकतीच झालेली बदली रदद करुन सिंदीकरांची होणारी असुविधा दुर करण्याबाबत गांधी चौक विचार मंचने मंगळवारी ( ता.१५) निवेदन देऊन मागणी केली आहे.

असंख्य ग्राहकाच्या स्वाक्षऱ्या असलेले सदर निवेदन नुकतेच रुजू झालेले कनिष्ठ अभियंता विनोद चाचेरकर यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील महावितरन कर्मचाऱ्यांच्या अभियंत्यासहित नुकत्याच बदल्या करण्यात आल्या यामुळे येथील मागील दोन तीन वर्षांपासून सुरळीत सुरू असलेले शहराचे विद्यृत नियोजन पुर्ते कोलमडले आहे.

नवनियुक्त कर्मचारी अद्याप रुज झाले नसुन जुनाजनता कर्मचारी कोणीच नसल्यांने आकस्मिक पावर कट झाल्यास पुर्ती फजिती होते.
विशेष म्हणजे महावितरन शाखा सिंदी च्या अंतर्गत ४२ ट्रान्सफारमर असुन असंख्य थ्री फेस आणि घरगुती ग्राहक आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असने गरजेचे आहे. मात्र येथे तीनच कर्मचारी कार्यरत आहेत. याच तीन कर्मचाऱ्यांवरच बीलाच्या वसुलीचे सुध्दा अतिरिक्त काम देण्यात आल्याने विज ग्राहकाची तक्रार वेळीच निकाली काढणे शक्य होत नाही.

यामुळे स्थानिक महावितरन शाखे विरुद्ध विद्यृत ग्राहकाचा रोष वाढत असुन विद्युतसेवा ही अत्यावश्यक असुन सर्वाची निकडीची गरज आहे. शिवाय पुढे सण उत्सव होवू घातले आहे. गोकुळअष्टमी, गणपती आणि त्यानंतर सिंदी शहर ज्यासाठी महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे तो विख्यात पोळा उत्सव साजरा होणार आहे इतिहासकालीन पोळ्यात दोन लाखांहून अधिक चाहत्यांची गर्दी होते यावेळी विद्यृत व्यवस्था चोख ठेवण्याची मोठी जबाबदारी महावितरन कर्मचाऱ्यांवर असते पोळ्यापुर्वी तरी कर्मचारी कमी संख्येची ही अडचन दुर करण्यात यावी आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची झालेली बदली ताबडतोब रदद करावी अशी मागणी होत आहे

 

कनिष्ठ अभियंता विनोद चाचेरकर यांना निवेदन देतांना गांधी चौक विचार मंचचे कार्यकर्ते

Leave a Comment