उपविभागीय अधिकाऱ्याच्या घरात चोरी

 

अनिल बोराडे धुळे

धुळ्यात चोरटयांनी उपविभागीय यांच्या घरी डल्ला मारला आहे. धुळ्याचे उपविभागीय भीमराव दराडे हे भाचीच्या लग्नासाठी बाहेर गावी गेले असताना त्यांच्या शासकीय निवास्थानी चोरटयांनी हात साफ करीत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. चोरटयांनी दराडे यांच्या घराला लावलेल्या कुलुपांची दांडी कापून घरात प्रवेश केला. नगदी रक्कम आणि अन्य बॅग चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दराडे हे लग्न समारंभात असल्याने नेमकी किती रक्कम चोरटयांनी चोरून नेली आहे हे समोर येऊ शकलेले नाही. मात्र चोरटयांनी घरात ठेवलेले मोबाईल , लॅपटॉप , टॅब या वस्तुंना हातही लावलेला नाही. घरातील सर्व कपाट मात्र चोरटयांनी शोधून काढल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी याच भागात एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरटयांनी धाडसी चोरी केली त्याचाही अजून उलगडा झालेला नाही.

Leave a Comment