आवजीसिद्ध महाराज संस्थानने राबविला वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंदिर रस्त्याच्या दुतर्फा लावली शोभिवंत वृक्षांची रोपे

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज संस्थान मंडळाचा वृक्षलागवडीचा व संवर्धनाचा उस्फुर्त कार्यक्रम सूनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज संचालक मंडळातर्फे आज आवजी सिद्ध महाराज मंदिर ते सुनगाव रोड पर्यंत दोन्ही रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई काळपांडे व पंचायत समिती जळगाव जामोद उपसभापती महादेवराव धुर्डे गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला दिवसेंदिवस झाडाची होत असलेली कमतरता लक्षात घेऊन संस्थेने वृक्षलागवडीच्या कार्यक्रम हाती घेतला आज दिनांक 13 आक्टोबर रोजी 50 झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली व त्यांना ट्री गार्ड कव्हर सुद्धा करण्यात आले पुढील काही दिवसात संस्थान मार्फत तीनशे झाडांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे व सूनगाव येथील पत्रकार संघातर्फे सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी पत्रकार राजकुमार भड , गजानन खिरोडकार, अश्विन राजपूत, गणेश भड, अनिल भगत, गजानन सोनटक्के यांनी वृक्षारोपन केले ,यावेळी पुंडलिकराव पाटील,मोहनसिंग राजपूत,सूनगाव ग्रामपंचायत प्रशासक पी एस राजपूत, ग्रामविकास अधिकारी चौधरी ,संस्थान अध्यक्ष सुरेश अंबडकार , उपाध्यक्ष पांडुरंग नानगदे, राजेश येउल, सचिव प्रवीण धर्मे ,सदस्य पांडुरंग फुसे, बळीराम वसुले,बळीराम वंडाळे, अरुण भाऊ धुळे ,शेषराव भगत मारुती गाडगे ,पुंडलिक पाटील, अनंत वंडाळे ,गजानन दातीर, सुनील भगत ,विष्णु राऊत ,शत्रुघ्न हिस्स्ल ,ग्रामपंचायत कर्मचारी सागर उमाळे, नितीन वसूलकार उपस्थित होते

Leave a Comment