आरोग्य विभागाची पूरग्रस्त लोकांसाठी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित

 

हिंगणघाट: मलक नईम

शहर व परिसरात सतत बरसणाऱ्या सरिमुळे गंभीर पुर स्थिती तयार झाली आहे. यावर परिणामकारक उपाय योजना शासन प्रशासन कडून अमलात आणल्या जात आहे.
अतिवृष्टी मुळे पाण्यापासून होणारे आजार, यावर नियत्रंण करण्याची गरज लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ किशोर चाचारकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ विशाल रुईकर यांच्या नेतृत्वात हे आरोग्य पथक आता पूरग्रस्त च्या आरोग्याची काळजी घेत आहे. पुराचे पाणी शहरातील अनेक वॉर्डातील घरात शिरले. त्यामुळे या पूर बाधितांना स्थानीय मोहता शाळेत स्तांलातरित करण्यात आले. या पूरग्रस्तां ची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यासाठी गठित चमू मधे डॉ योगेश वाघमारे, डॉ अमित तावडे, डॉ शुंभागी श्रीराव, डॉ संजीवनी देवलकर, आरोग्य सेविका सविता पाणबुडे, माधुरी चौधरी, ,,औषधी निर्माण अधिकारी कु हिणा शेख ,,, आरोग्य सेवक सचिन खंदार, सुभाष वाडगे इत्यादींची चमू गठित करण्यात आलेली आहे. त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी जाऊन आरोग्य सेवा दिल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य सेवकांनी पूरग्रस्त भागात जाऊन त्या ठीकानी संभाव्य आजार तथा पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आणि पाण्याच्या शुद्धते वर देखरेख करण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहे. या दरम्यान पूर्व सूचना न देता रजेवर राहण्यास मनाइ करण्यात आलेली आहे.

Leave a Comment