अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या

0
443

 

गोदिया-शैलेश राजनकर

चिचगड,दि.0२ः चिचगड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वासणी जंगल परिसरात एका अनोळखी इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृतकाच्या शरीरावर गडद हिरव्या रंगाच्या स्वेटर घातलेला असून असून हातावर इंग्रजीमध्ये के लिहिलेला आहे.मृतक 20 ते 22 वर्षाचा असावा असा अंदाज आहे. सदर मृतदेह छत्तीसगड भागातील असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे.सदर प्रकरणाची नोंद चिचगड पोलीस स्टेशनला झाली असून प्रकरणाचा तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय इसकापे करीत आहेत. कुणाला सदर मृतदेहाची ओळख पटल्यास संबंधित फोनवर संपर्क साधावा ०८८८९५८५८४२ असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here